परिचय
गिरीश कान्हा म्हात्रे यांचा परिचय
नगरसेवकसभापती, क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीनवी मुंबई महानगरपालिकाप्रभाग क्र. २४

प्रभाग क्र. २४ • नेरुळ व सीवूड्स
गिरीश कान्हा म्हात्रे नेरुळ व सीवूड्सच्या प्रभाग २४ मधील नगरसेवक आहेत. ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत.
२०१५ मध्ये ते नेरुळ गावातून निवडून आले होते. यापूर्वी त्यांनी विद्यार्थी व युवक कल्याण समितीचे सभापतीपद सांभाळले आहे.
त्यांचे वडील श्री. के. एन. म्हात्रे हे नेरुळ गावचे माजी सरपंच होते.
कोरोना काळातील कार्य
कोरोना काळात कार्यालयामार्फत औषधे, धान्य आणि मास्कचे वाटप, रुग्णवाहिका सेवा, निर्जंतुकीकरण आणि रुग्णालयात खाट मिळवण्यासाठी मदत करण्यात आली.
आरोग्यविषयक पाठपुरावा
उपचार आणि रुग्णालयाच्या बिलांसंबंधी पाठपुरावा तसेच नेरुळ गावातील आरोग्य तपासणी शिबिरे.
क्रीडा, संस्कृती व युवक कल्याण
गिरीश म्हात्रे नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती आहेत. स्थानिक खेळाडू आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी संधी निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे.

